Skip to main content

शून्यातून शिखरापर्यंत : एका लहानशा दुकानापासून झाली एमडीएचची सुरुवात

 



एमडीएच म्हणजे 'महाशियां दी हट्टी'... याचा सरळ अर्थ आहे प्रतिष्ठित माणसाचे दुकान. श्रीमान धर्मपाल गुलाटी यांनी ती प्रतिष्ठा कमावली. तिचा दावा त्यांच्या पित्याने आपल्या दुकानासमोर लावलेल्या बोर्डवर केला होता. आज हा ब्रँड इतका मोठा आहे की, गेल्या रविवारी धर्मपाल यांच्या मृत्यूच्या अफवेने खळबळ उडवून दिली. 


धर्मपाल यांचे वय ९५ वर्षे आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासून व्यवसायाचा अनुभव. त्यांचे वडील आरशांचा व्यवसाय करायचे. १९३७ ची गोष्ट. त्यांच्या वडिलांनी साबण, कपडे आणि लाकडाचा व्यवसायही करून पाहिला. १९४७ उजाडेपर्यंत धर्मपाल यांच्याकडे अपयशाचा भरपूर अनुभव जमला. फाळणीमुळे ते पाकिस्तानच्या सियालकोटमधून अमृतसरच्या विस्थापितांच्या शिबिरात पोहोचले. मग त्यांना दिल्लीत घर मिळाले. तेथे ना वीज होती ना पाणी ना शौचालय. खिशात वडिलांनी दिलेले १५०० रुपये. धर्मपाल यांनी ६५० रुपयात टांगा घेतला. २ आण्यात ते प्रवाशांना सेवा देऊ लागले. २०१६ साली याच सीईओंनी जवळपास २१ कोटी रुपये वेतन घेतले, जे एमडीएचच्या वर्षाच्या २१३ कोटी रुपयांच्या दहा टक्के इतके होते. 




एमडीएचची ८० टक्के भागीदारी धर्मपाल यांच्याकडेच आहे. ६० वर्षांपूर्वी एमडीएचची सुरुवात दिल्लीच्या अजमल खान रोडवर छोट्याशा दुकानाच्या रूपात झाली. गुणवत्ता आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी पावले टाकली. दुकाने थाटत गेले. लवकरच दिल्लीत मसाल्यांचा कारखाना सुरू केला. भारतीय मसाला बाजारात ही कंपनी दुसऱ्या स्थानी आहे. तिची हिस्सेदारी जवळपास १२ टक्के आहे. क्रमांक एकवर एव्हरेस्ट मसाले आहे. एमडीएचचे १६०० कोटी रुपयांचे साम्राज्य आहे. देशभरत जवळपास १५ कारखाने आहेत. एक हजार डीलरच्या माध्यमातून त्यांची उत्पादने घरोघरी पोहोचतात. दुबई आणि लंडनमध्येही एमडीएचची कार्यालये आहेत. १०० हून जास्त देशात ते उत्पादने वितरित करतात.एमडीएचकडे जवळपास ६२ उत्पादने आहेत. जी १५० प्रकारच्या पॅकेजमध्ये मिळतात. कंपनीने काही चॅरिटेबल संस्था अाणि रुग्णालये सुरू केली आहेत. २० शाळाही सुरू केल्या आहेत, ज्यात गरिबांची मुले शिकतात. 





Comments

Popular posts from this blog

शेती गहाण ठेवून उद्योग उभारणारा ‘विठ्ठल’

  बांधकाम उद्योगामुळे विठ्ठल सरप पाटील अकोलासारख्या ठिकाणी शंभरहून अधिक लोकांना रोजगार देऊ शकला. अल्पावधीतच ही कंपनी काही कोटी रुपयांची उलाढाल करु लागली. अकोला जिल्ह्यामधील सर्वांत मोठी नागरी वसाहत बांधण्याचे विठ्ठलरावांचे स्वप्न आहे. अकोला. विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा. अनेक ऐतिहासिक- सामाजिक-राजकीय घडामोडींचा साक्षीदार असणारा जिल्हा. अन्य जिल्ह्यांप्रमाणे येथेही उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन म्हणजे शेतीच. येथील एका शेतकर्‍याने आपली शेती गहाण ठेवली आणि स्वत:चा उद्योग उभारला. हा उद्योग उभारुन शंभरच्यावर लोकांना रोजगार दिला. सेंद्रिय शेताची आवड असलेला, पण व्यावहारिकतेचंसुद्धा तेवढंच ज्ञान असलेल्या त्या तरुणाने अचूक निर्णय घेतला आणि त्या निर्णयाने त्यास एक उद्योजक म्हणून घडविले. शेती शेतकर्‍याला फक्त जगवते असं नव्हे, तर ती त्याला ‘उद्योजक’ म्हणून सुद्धा घडवते. हा उद्योजक म्हणजे ‘राजवी इन्फ्रास्ट्रक्चर’चे संचालक विठ्ठल सरप पाटील. शेतीला आज वेगवेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. निव्वळ शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी विविध उद्योगसुद्धा करु लागले आहेत. काहीजण नोकर्‍यासुद्धा करु लागले. पुरुषोत्तम...

पैसे इंटरनेट खात्याशिवाय ट्रान्सफर कसे करतात?

  जर तुम्ही भीम अ‍ॅप वापरत असाल तर मी तुम्हाला इंटरनेटशिवाय पैसे कसे पाठवू शकते, मी तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती कोणत्याही बँक खात्यात सांगणार आहे. ही सेवा वापरण्यासाठी सर्वप्रथम भिम अपमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये आपले बँक खाते लिंक करणे देखील आवश्यक आहे आणि यूपीआय पिन तयार करणे देखील आवश्यक आहे, असे म्हणायचे आहे की जर आपण बँक तपासली तर भीम fromपमधून शिल्लक आणि जर तुम्हाला बँकेतून पैसे कसे ट्रान्सफर करायचे हे माहित असेल तर तुम्ही इंटरनेट शिवाय पैसे पाठवू शकता, कारण तुमचे काम झाले तरी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाइल नसेल तर तुम्ही तुमच्याकडून पैसे ट्रान्सफर देखील करू शकता. आपल्या बँक खात्यातून इतर कोणत्याहीसाठी कीपॅड मोबाइल सोपा. बँक खात्यात इंटरनेटशिवाय पैसे पाठविण्याचा मार्ग आता मी तुम्हाला इंटरनेटशिवाय पैसे कसे हस्तांतरित करावे याबद्दल सविस्तरपणे सांगत आहे. सर्व प्रथम, आपल्याला आपल्या मोबाइलच्या डायल पॅडमध्ये * 99 # डायल करावे लागेल. जेव्हा आपण हा नंबर आपल्या मोबाइलमध्ये डायल करता तेव्हा आपल्यास आपल्या समोर एक संदेश येईल, जो आपला स्वागत आहे * 99 # आपल्याला स्वागत सं...

Resorts in Malshej Ghat-Hill Station Resort | 7977153733 | Shivneri Junnar, Harichandragad, Naneghat, Jivdhan Farm House, Hotel Tent City.

Malshej Ghat Hill Station Resort | 7977153733 | Shivneri Junnar, Harichandragad, Naneghat, Jivdhan Farm House, Hotel Tent City. kokaneinternational-tourism.blogspot.com Contact- (91)-7977153733 Email-xoneyoza@gmail.com Maharashtra India.  Couples, friends & Social Group. Malshej Farm house. Wild Animal park, Beautiful Mountain, Great Culture,  Historical place. Malshej International Tour Farm. Near Shivneri fort, Malshejghat, Harichandragad, Lenyadri,Ozar, Naneghat, Jivdhan fort, Bhimashankar. Enjoy Weekend Life with Friends and Family. Email-onemumbai@gmail.com  Whattup- (91) -7977153733 Tourist Car, Tourist villa,Bungalow available for stay. Email-onemumbai@gmail.com Whattup- (91) - 7977153733   Farmhouse is available near Mumbai and Pune for Film Shooting, Serial Shooting, Birthday Party, Event, Family Party, Friends Party  Place. onemumbai@aol.com  Call-7977153733  Malshej International Tour Farm.| 7977153733 | Near Shivneri fort, Malshejghat, ...