Skip to main content

तीस गुंठ्यात अडीच लाखांचे केळीचे उत्पादन

 



कष्ट करण्याची तयारी, नियोजनबद्ध काम व जिद्दी वृत्ती असल्यास अशक्य असे काहीच नाही. केळीची शेती परवडत नाही, असा नकारात्मक विचार करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे मिणचे खुर्द (ता.भुदरगड) येथील तरुण शेतकऱ्याने केळीचे भरघोस उत्पन्न घेऊन आदर्श निर्माण केला आहे.


कष्ट करण्याची तयारी, नियोजनबद्ध काम व जिद्दी वृत्ती असल्यास अशक्य असे काहीच नाही. केळीची शेती परवडत नाही, असा नकारात्मक विचार करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे मिणचे खुर्द (ता.भुदरगड) येथील तरुण शेतकऱ्याने केळीचे भरघोस उत्पन्न घेऊन आदर्श निर्माण केला आहे. किसन महादेव सोकासने यांनी ३० गुंठ्यात २ लाख ५० हजाराचे उत्पादन वर्षात घेऊन वेगळेपण सिद्ध केले आहे.



स्वतःचे भरपूर शेत असणाऱ्या पण नियोजनबद्ध शेती न करणाऱ्या आधुनिक शेतकऱ्यांना सोकासने यांनी कुटुंबियांच्या कष्टातून फुलविलेला मळा आदर्शवत असा आहे. कष्ट व नियोजनबद्ध शेती केल्यास अशक्य काहीच नाही, असे ते सांगतात. सोकासने यांनी कोळवण-मिणचे रस्त्यावरील तांबोळा नावाच्या शेतात चालू वर्षी ३० गुंठे क्षेत्रात पुण्यातील बावचकर टेक्नॉलॉजी येथून ‘जी ९’ जातीची १२०० केळीची रोपे आणून भरघोस उत्पादन घेतले. त्यांनी ट्रॅक्टरने मशागत करून पाच बाय चार अंतरावर लागण केली. त्यांनी शेणखत व लेंडीखताच्या १२ ट्रॉल्या लागणीसाठी वापरल्या. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांना त्यांनी प्राधान्य दिले. पाण्याचा अपव्यय, भांगलण खर्च, मजुरी यामध्ये बचत करण्यासाठी शेतात ठिबकचा वापर केला. स्वतःच्या विहिरीच्या पाण्यावर त्यांनी हे उत्पादन घेतले.

१२ वी पर्यंत शिक्षण घेतलेले सोकासने हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी सर्वसाधारण नांगरट करून ५ बाय ४ अंतरावर लागण करून शेणखताचा जास्त वापर व रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून ठिबकद्वारे स्वतःच्या विहिरीतील पाणी दिले. यासाठी त्यांना वडील महादेव सोकासने, आई मालती सोकासने, आंबूबाई सोकासने, पत्नी रुपाली सोकासने, पद्मा सोकासने, संतोष सोकासने यांचे वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभले. आंतरमशागत, खत व्यवस्थापन, पीक संरक्षण यासाठी त्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन भरघोस उत्पादन घेतले आहे. सोकासने यांचे परिसरातून कौतुक होत आहे.


 शेती उद्योग म्हणजे तोट्यातील उद्योग, केवळ राबणुकीचे पैसे मिळतात असा शेतकऱ्यांचा समज आहे. आणि तो थोड्याप्रमाणात खराही आहे. चाकोरीबध्द पारंपरिक शेती, निसर्गाचे चमत्कारिक बदल, सरकारची धोरणे यामुळे असे होत असले तरी मी या सर्वांचा साकल्याने विचार करून चाकोरी सोडून केळी उत्पादन घेण्याचे ठरविले आणि माझ्या कष्टाचे फळ मिळाले.

- किसन सोकासने, शेतकरी, मिणचे खुर्द



Comments

Popular posts from this blog

शेती गहाण ठेवून उद्योग उभारणारा ‘विठ्ठल’

  बांधकाम उद्योगामुळे विठ्ठल सरप पाटील अकोलासारख्या ठिकाणी शंभरहून अधिक लोकांना रोजगार देऊ शकला. अल्पावधीतच ही कंपनी काही कोटी रुपयांची उलाढाल करु लागली. अकोला जिल्ह्यामधील सर्वांत मोठी नागरी वसाहत बांधण्याचे विठ्ठलरावांचे स्वप्न आहे. अकोला. विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा. अनेक ऐतिहासिक- सामाजिक-राजकीय घडामोडींचा साक्षीदार असणारा जिल्हा. अन्य जिल्ह्यांप्रमाणे येथेही उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन म्हणजे शेतीच. येथील एका शेतकर्‍याने आपली शेती गहाण ठेवली आणि स्वत:चा उद्योग उभारला. हा उद्योग उभारुन शंभरच्यावर लोकांना रोजगार दिला. सेंद्रिय शेताची आवड असलेला, पण व्यावहारिकतेचंसुद्धा तेवढंच ज्ञान असलेल्या त्या तरुणाने अचूक निर्णय घेतला आणि त्या निर्णयाने त्यास एक उद्योजक म्हणून घडविले. शेती शेतकर्‍याला फक्त जगवते असं नव्हे, तर ती त्याला ‘उद्योजक’ म्हणून सुद्धा घडवते. हा उद्योजक म्हणजे ‘राजवी इन्फ्रास्ट्रक्चर’चे संचालक विठ्ठल सरप पाटील. शेतीला आज वेगवेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. निव्वळ शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी विविध उद्योगसुद्धा करु लागले आहेत. काहीजण नोकर्‍यासुद्धा करु लागले. पुरुषोत्तम...

शून्यातून शिखरापर्यंत : एका लहानशा दुकानापासून झाली एमडीएचची सुरुवात

  एमडीएच म्हणजे 'महाशियां दी हट्टी'... याचा सरळ अर्थ आहे प्रतिष्ठित माणसाचे दुकान. श्रीमान धर्मपाल गुलाटी यांनी ती प्रतिष्ठा कमावली. तिचा दावा त्यांच्या पित्याने आपल्या दुकानासमोर लावलेल्या बोर्डवर केला होता. आज हा ब्रँड इतका मोठा आहे की, गेल्या रविवारी धर्मपाल यांच्या मृत्यूच्या अफवेने खळबळ उडवून दिली.  धर्मपाल यांचे वय ९५ वर्षे आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासून व्यवसायाचा अनुभव. त्यांचे वडील आरशांचा व्यवसाय करायचे. १९३७ ची गोष्ट. त्यांच्या वडिलांनी साबण, कपडे आणि लाकडाचा व्यवसायही करून पाहिला. १९४७ उजाडेपर्यंत धर्मपाल यांच्याकडे अपयशाचा भरपूर अनुभव जमला. फाळणीमुळे ते पाकिस्तानच्या सियालकोटमधून अमृतसरच्या विस्थापितांच्या शिबिरात पोहोचले. मग त्यांना दिल्लीत घर मिळाले. तेथे ना वीज होती ना पाणी ना शौचालय. खिशात वडिलांनी दिलेले १५०० रुपये. धर्मपाल यांनी ६५० रुपयात टांगा घेतला. २ आण्यात ते प्रवाशांना सेवा देऊ लागले. २०१६ साली याच सीईओंनी जवळपास २१ कोटी रुपये वेतन घेतले, जे एमडीएचच्या वर्षाच्या २१३ कोटी रुपयांच्या दहा टक्के इतके होते.  एमडीएचची ८० टक्के भागीदारी धर्मपाल यांच्याक...

पैसे इंटरनेट खात्याशिवाय ट्रान्सफर कसे करतात?

  जर तुम्ही भीम अ‍ॅप वापरत असाल तर मी तुम्हाला इंटरनेटशिवाय पैसे कसे पाठवू शकते, मी तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती कोणत्याही बँक खात्यात सांगणार आहे. ही सेवा वापरण्यासाठी सर्वप्रथम भिम अपमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये आपले बँक खाते लिंक करणे देखील आवश्यक आहे आणि यूपीआय पिन तयार करणे देखील आवश्यक आहे, असे म्हणायचे आहे की जर आपण बँक तपासली तर भीम fromपमधून शिल्लक आणि जर तुम्हाला बँकेतून पैसे कसे ट्रान्सफर करायचे हे माहित असेल तर तुम्ही इंटरनेट शिवाय पैसे पाठवू शकता, कारण तुमचे काम झाले तरी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाइल नसेल तर तुम्ही तुमच्याकडून पैसे ट्रान्सफर देखील करू शकता. आपल्या बँक खात्यातून इतर कोणत्याहीसाठी कीपॅड मोबाइल सोपा. बँक खात्यात इंटरनेटशिवाय पैसे पाठविण्याचा मार्ग आता मी तुम्हाला इंटरनेटशिवाय पैसे कसे हस्तांतरित करावे याबद्दल सविस्तरपणे सांगत आहे. सर्व प्रथम, आपल्याला आपल्या मोबाइलच्या डायल पॅडमध्ये * 99 # डायल करावे लागेल. जेव्हा आपण हा नंबर आपल्या मोबाइलमध्ये डायल करता तेव्हा आपल्यास आपल्या समोर एक संदेश येईल, जो आपला स्वागत आहे * 99 # आपल्याला स्वागत सं...