Skip to main content

Posts

उद्योजक व्हा... : प्लास्टिक उद्योगाचा राजा

  तांत्रिक शिक्षण नसतानाही ‘प्लास्टिक मोल्डिंग’मधील तंत्र-मंत्र जाणून-अभ्यासून घेत औरंगाबादेतील दोन खोल्यात मिळेल ते काम सुरू केले. ‘केनस्टार’कडून एक क्लिष्ट काम मिळाले आणि ते यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यामुळेच ठ अनेक कंपन्यांची व्हेन्डरशिप मिळाली आणि आज देशभरातील अनेक कंपन्यांना अनेक प्लास्टिकचे भाग पुरवणारे चंद्रगुप्त कणसे हे यशस्वी उद्योजक ठरले आहेत. कणसे कुटुंबीय हे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील तपोवन या गावचे. चंद्रगुप्त यांचे वडील बापूराव हे शेतकरी व शेती हेच कुटुंबाचे एकमेव उत्पन्नाचे साधन. शेती पूर्णपणे कोरडवाहू असल्याने उत्पन्न मर्यादित व बेभरवशाचे. त्यातच आई-वडिलांसह चार भाऊ व एक बहीण असे मोठे कुटुंब असल्याने आर्थिक ताणाताण होत होती. त्यामुळेच भावंडांचे जमेल तसे शिक्षण सुरू होते. चंद्रगुप्त यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले आणि पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण शिरसाळा येथे झाले. त्यासाठी रोजच गावातून शाळेपर्यंत चार किलोमीटर पायपीट करावी लागत होती. त्यानंतर अकरावी ते बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण परळीत झाले व औरंगाबादेत ‘एमएसडब्ल्यू’ केले. बी.कॉम.चे शिक्षण सुरू असतानाच चंद...

जिद्दीच्या जोरावर उद्योगभरारी

जयसिंगच्या वडिलांचा घरीच दंतमंजनाचा लघुउद्योग होता. यावरच कुटुंबाची उपजीविका अवलंबून होती. प्रवाहाच्या दिशेने सारेच पोहत असतात, कारण तसे पोहणे सोपे असते. त्यासाठी वेगळे श्रम करावे लागत नाहीत. खरा कस लागतो तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यात. अन् प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना शारीरिक अपंगत्व असेल तर प्रवास अगदीच कठीण बनत असतो. पण काही ध्येयवादी माणसे ध्येयाप्रति इतके समर्पित वृत्तीने प्रयत्नांच्या यज्ञकुंडात स्वत:ला झोकून देतात की ‘बावनकशी’ यश त्यांच्या पदरात पडत असते. अशाच एका दुर्दम्य इच्छावादी व यशस्वी उद्योजक जयसिंग चव्हाण यांची ही साहस कथा.. डॉक्टरने केलेल्या चुकीच्या उपचारामुळे जयसिंग चव्हाण यांना वयाच्या १८व्या महिन्यात कायमचे अपंगत्व आले. मुलाचे दोन्ही पाय निकामी झाल्याचे कळताच आई रंजना व वडील कृष्णकांत यांनी नागपूर व जयपूर येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडे नेऊन अनेकवेळा शस्त्रक्रिया केल्या. मात्र जयसिंगला त्याच्या पायावर उभे करण्यात त्यांना यश मिळले नाही. अन् त्यामुळे जयसिंगला ८७ टक्केकायमचे अपंगत्व आले. अपंगत्वामुळे जयसिंगचे पूर्ण जीवन अधांतरी झाले. त्याचे संपूर्ण जीवन पालकांवर अबलंबून हो...

तीस गुंठ्यात अडीच लाखांचे केळीचे उत्पादन

  कष्ट करण्याची तयारी, नियोजनबद्ध काम व जिद्दी वृत्ती असल्यास अशक्य असे काहीच नाही. केळीची शेती परवडत नाही, असा नकारात्मक विचार करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे मिणचे खुर्द (ता.भुदरगड) येथील तरुण शेतकऱ्याने केळीचे भरघोस उत्पन्न घेऊन आदर्श निर्माण केला आहे. कष्ट करण्याची तयारी, नियोजनबद्ध काम व जिद्दी वृत्ती असल्यास अशक्य असे काहीच नाही. केळीची शेती परवडत नाही, असा नकारात्मक विचार करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे मिणचे खुर्द (ता.भुदरगड) येथील तरुण शेतकऱ्याने केळीचे भरघोस उत्पन्न घेऊन आदर्श निर्माण केला आहे. किसन महादेव सोकासने यांनी ३० गुंठ्यात २ लाख ५० हजाराचे उत्पादन वर्षात घेऊन वेगळेपण सिद्ध केले आहे. स्वतःचे भरपूर शेत असणाऱ्या पण नियोजनबद्ध शेती न करणाऱ्या आधुनिक शेतकऱ्यांना सोकासने यांनी कुटुंबियांच्या कष्टातून फुलविलेला मळा आदर्शवत असा आहे. कष्ट व नियोजनबद्ध शेती केल्यास अशक्य काहीच नाही, असे ते सांगतात. सोकासने यांनी कोळवण-मिणचे रस्त्यावरील तांबोळा नावाच्या शेतात चालू वर्षी ३० गुंठे क्षेत्रात पुण्यातील बावचकर टेक्नॉलॉजी येथून ‘जी ९’ जातीची १२०० केळीची रोपे आणून भरघोस उत्पादन घेतले. त्यांनी ट्रॅक...

शून्यातून शिखरापर्यंत : एका लहानशा दुकानापासून झाली एमडीएचची सुरुवात

  एमडीएच म्हणजे 'महाशियां दी हट्टी'... याचा सरळ अर्थ आहे प्रतिष्ठित माणसाचे दुकान. श्रीमान धर्मपाल गुलाटी यांनी ती प्रतिष्ठा कमावली. तिचा दावा त्यांच्या पित्याने आपल्या दुकानासमोर लावलेल्या बोर्डवर केला होता. आज हा ब्रँड इतका मोठा आहे की, गेल्या रविवारी धर्मपाल यांच्या मृत्यूच्या अफवेने खळबळ उडवून दिली.  धर्मपाल यांचे वय ९५ वर्षे आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासून व्यवसायाचा अनुभव. त्यांचे वडील आरशांचा व्यवसाय करायचे. १९३७ ची गोष्ट. त्यांच्या वडिलांनी साबण, कपडे आणि लाकडाचा व्यवसायही करून पाहिला. १९४७ उजाडेपर्यंत धर्मपाल यांच्याकडे अपयशाचा भरपूर अनुभव जमला. फाळणीमुळे ते पाकिस्तानच्या सियालकोटमधून अमृतसरच्या विस्थापितांच्या शिबिरात पोहोचले. मग त्यांना दिल्लीत घर मिळाले. तेथे ना वीज होती ना पाणी ना शौचालय. खिशात वडिलांनी दिलेले १५०० रुपये. धर्मपाल यांनी ६५० रुपयात टांगा घेतला. २ आण्यात ते प्रवाशांना सेवा देऊ लागले. २०१६ साली याच सीईओंनी जवळपास २१ कोटी रुपये वेतन घेतले, जे एमडीएचच्या वर्षाच्या २१३ कोटी रुपयांच्या दहा टक्के इतके होते.  एमडीएचची ८० टक्के भागीदारी धर्मपाल यांच्याक...

विचार बदला जीवनाची दिशाही बदलेल

  एक खूप श्रीमंत माणूस होता. पण त्याच्याकडे असलेल्या संपत्ती एवढे त्याचे मन मोठे नव्हते. एखाद्याला पैसे दिले तर स्वत:चे मोठेपण तो १० लोकांना जाऊन सांगयचा. तो जेथे-जेथे जायचा तेथे आपण किती दानशूर आणि दयाळू आहोत याबद्दल सांगायचा. एक खूप श्रीमंत माणूस होता. पण त्याच्याकडे असलेल्या संपत्ती एवढे त्याचे मन मोठे नव्हते. एखाद्याला पैसे दिले तर स्वत:चे मोठेपण तो १० लोकांना जाऊन सांगयचा. तो जेथे-जेथे जायचा तेथे आपण किती दानशूर आणि दयाळू आहोत याबद्दल सांगायचा. एके दिवशी शहरात थोर विचारवंत आले असल्याचे त्याला कळले. तो त्वरित त्यांना भेटायला गेला. त्या श्रीमंतमाणसाचे आदरातिथ्य केल्यावर त्या थोर विचावंताने त्याला भेटायला येण्याचे कारण विचारले. मात्र आपले येण्याचे कारण न सांगता तो स्वत:च्या संपतीचे आणि दानशूरतेचे गोडवे गाऊ लागला. च्या दानशूरपणाच्या गोष्टी सांगून झाल्यावर त्या श्रीमंत माणसाने पैशाचे पाकिट काढून थोर विचारवंताला देऊ केले आणि म्हणाला, 'तुम्हाला पैशाची गरज आहे असे मला वाटले म्हणून मी हे आणले आहे.' हे सांगत असताना त्याच्या डोळ्यात वेगळात अहंकार दिसत होता. त्या थोर विचारवंत पैशाचे प...

हात नसलेली शेफ

  हि एक सत्य घटनेवर आधारित ,  एका भयानक त्रासातून गेलेल्या स्त्री ची कथा आहे. जेंव्हा तुम्ही ह्या मुलीची कथा वाचाल तेंव्हा तुम्हाला कळेल कि आपली दुःख किती लहान आहेत. हि घटना आहे  25  सप्टेंबर  2000  ची ,  मारिकेल आपटन नावाची झाम्बोआंग मधील हि ११ वर्षांची लहान मुलगी. दिसायला खूप छान. मध्यम आकाराचे डोळे ,  नकटं नाक आणि चेहऱ्यावर नेहमी सुंदर  smile  असणारी. ती तिच्या आई बरोबर राहत होती ,  तिथूनच काही  अंतरावर तिच्या काकांचे घर होते. मारिकेल नेहमी आपल्या काकांकडे पाणी भरण्यासाठी जात असायची. आजही तिचा तोच दिनक्रम काही चुकला नव्हता. पण आजचा दिवस हा तिच्यासाठी एवढा वाईट असेल ह्याची तिला जराही जाणीव नव्हती. ती तिथे पोहचली. आणि  पाहते तर काय ?  तिच्या काकांना चार माणसांनी घेरून ठेवले होते ,  आणि काका घुडघ्यावर खाली मान घालून  बसले होते.  सुरवातीला तिला काही कळेना कि नेमकं काय घडत आहे. कारण जे चार माणसांना ती बघत होती ,  ती माणसं त्यांच्याच आसपास राहणारे होते. आणि काही कळायच्या आत त्या चिमुरडीच्या समोर त्या ...